काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

*कोकण Express*

*काळसे येथे बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन*

*खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे*

मोबाईल रेंज ची समस्या असलेल्या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून आज या टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.त्यामुळे गावातील रेंज ची समस्या आता दूर झाली आहे.तसेच आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून काळसे गोसावीवाडी श्री.सिद्धमहापुरुष मंदिर नजीक संरक्षक भिंतीसाठी ६ लाख रु. चा निधी मंजूर केला असून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, माजी जी.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम,सुनील सावंत, बाळ महाभोज,यशवंत भोजने,बाबू टेंबुलकर, संदीप सावंत,अनिल प्रभू, जयवंत केळुसकर, केशव सावंत, राजन प्रभू, उमेश प्रभू, नंदू प्रभू, बीएसएनएलचे उप मंडल अभियंता (मालवण) प्रवीण कवडे,मोबाईल उप मंडल अभियंता सुधीर देशमुख, आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!