महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त  आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जयंती साजरी

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त  आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जयंती साजरी

*कोकण Express*

*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त  आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जयंती साजरी*

कणकवली ः प्रतिनिधी*

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा व समविचारी संघटना,सिंधूदुर्ग यांच्या वतीने आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक जुना भाजीपाला मार्केट कणकवली) यांच्या वतीने श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि सर्व व्यापारी बांधवा यांच्या उपस्थितीत श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) व श्री संदीप साळोखे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले
याप्रसंगी “कधी एखादी स्त्री मंदिराची मुख्य पुजारी नाही बनू शकली, ना मस्जिद ची मौलाना बनू शकली, ना चर्च ची मुख्य पादरी बनू शकली, ना कधी कोणत्याही धर्माची विश्र्वविख्यात धर्मगुरू बनू शकली,
पण एक स्त्री सांसद, स्पीकर,राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, कलेक्टर, सचिव,…… सर्व बनू शकते. जे अधिकार धर्म नाही देऊ शकला, ते सर्व अधिकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने स्त्रियांना दिले.
अशा महामानवाला विनम्र अभिवादन करतो, असे विचार श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले
यावेळी उपस्थित सर्व नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ च्या पदाधिकारी तसेच आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील सर्व व्यावसायिकांनी पुष्पांजली अर्पण करून नतमस्तक झाले
आयोजकांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देवुन आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!