*कोकण Express*
*भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गिर्ये गावात उत्साहात साजरी*
*देवगड ः प्रतिनिधी*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गिर्ये- बौद्धवाडी येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपा. जिल्हा सरचिटनीस मा. आरिफभाई बगदादी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, सचिन गिरकर, दिलीप गिरकर, दीपक गिरकर, पराग घाटये यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केले. या प्रसंगी सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.