नांदगाव सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनेलचा दमदार विजय

नांदगाव सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनेलचा दमदार विजय

*कोकण Express*

*नांदगाव सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनेलचा दमदार विजय*

*भाजपाचा १३ ही जागांवर दारुण पराभव*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव सोसायटी निवडणुकीत भाजप व शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेल्या नांदगाव सोसायटी निवडणुकी्त झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर रात्री उशिरापर्यंत निकाल लागला. या निकालात नांदगाव विविध विकास सहकारी सोसायटीत शिवसेना प्रणित बळीराजा पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत भाजप प्रणित सिध्दविनायक पॅनलचा दारुण पराभव केला.शिवसेना नेते गौरीशंकर खोत हे किंगमेकर ठरले आहेत. विजयानंतर नांदगाव सोसायटी कार्यालय व नांदगाव तिठ्ठा येथे एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कणकवली तालुक्यातील मोठ्या सोसायटी गणली जाणारी नांदगाव विकास सोसायटी आहे.तोडवली बावशी, ओटव,सावडाव,नांदगाव व अन्य गाव अंतर्भूत असलेली सोसायटी आहे.त्यामुळे या सोसायटीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती, अखेर या चढाओढीत शिवसेनेने बाजी मारली आहे.

विकास सोसायटी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कर्जदार गटातून श्री.विजय कदम 245,दिपक कांडर 242,आब्बास बटवाले 244,विठोबा महाडेश्वर 248,गौरीशंकर खोत 250,अतुल सदडेकर 238,अनिल चव्हाण 229,प्रकाश सातोसे 246,महिला प्रतिनिधी मधून हसीना बटवाले 280,प्रभावती माळकर 256, तर इतर मागस प्रवर्ग गटातून शामसूंदर मोरये 284,भटका विमुक्त जाती मधून तात्या निकम 284, अनुसूचित जाती जमाती मधून धर्माजी तांबे 280 यानी यश संपादन केले.

विजयानंतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होत विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण निवडूकीचे किंगमेकर गौरीशंकर खोत,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कैन्हया पारकर, सचिन सावंत, रिमेश चव्हाण, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर,माजी चेअरमन रविंद्र तेली,अरूण बापार्डेकर यानी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

या सोसायटी साठी तब्बल ७८ वर्षाच्या कालावधीत एकदाच या सोसायटीची एका जागेसाठी निवडणूक झाली होती. यानतंर यावर्षी निवडणूक झाली यात शिवसेनेने बाजी मारली.

सांघिक कामगिरी मुळे मिळाला विजय-गौरीशंकर खोत

हा विजय वैचारीक असून नांदगाव सोसायटीतील सहा गावातील शिवसेना पदाधिकारी, मतदार,ग्रामस्थ यानी सांघिक काम केल्यामुळेच हा विजय झाला आहे.आम्ही विरोधकांशी लढलो,आणि चांगल्या मताधिक्याने जिंकलो,याचा आम्हाला अभिमान आहे,अशी प्रतिक्रिया पॅनल प्रमुख ,शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांनी दिली.

विजयाचे खरे शिल्पकार गौरीशंकर खोत-सतीश सावंत

राजकारण निवडणूक कशी लढवावी, रणनीती कशी असावी ही चाणक्यनिती गौरीशंकर खोत यांची अनेक वर्षे आम्ही पाहिली आहे.पूर्वी आम्ही अश्याच पद्धतीने निवडणुका लढलो,त्यावेळेस खोत यांची रणनीती यशाची कायम राहिली.नांदगाव सोसायटी निवडणुक विजयाचे खरे शिल्पकार गौरीशंकर खोत आहेत.त्यांचे व सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!