*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा-माजी राज्यमंत्री चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पाहता त्यावर प्रशासक नियुक्त करणे गरजेचे आहे.ऑडिट पॉईंट असतांना चुकीच्या पद्धयटीने नोकर भरती सुरू आहे.खोट्या मस्टरवर खोट्या सह्या घेतल्या जात आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे गुन्हा आहे.सरकारने याकडे लक्ष घालून संबधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी,माजी राज्यमंत्री, भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले ,मुळातच जिल्हा बँकेत जास्त कर्मचारी आहेत.नव्याने कर्मचाऱ्यांनची भरती करू नये अशा प्रकारचा ऑडिट पॉईंट आलेला असतांना बँकेवरील सत्ताधारी गैरकारभार करत आहेत. बँक संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला असतांना अधिकार नसतांना लोकांना नोकरीची आमिषे दाखवून खोट्या मस्टरवर खोट्या सह्या घेतल्या जात आहेत. हा प्रकार म्हणजे लोकांची फसवणूक आहे. हा गुन्हा आहे. सरकारने याकडे लक्ष घातले पाहिजे आणि संबधीतांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली