*कोकण Express*
*नांदगाव सोसायटी निवडणूकीचे किंगमेकर गौरीशंकर खोत यांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन*
नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकिमध्ये शिवसेना पुरस्कृत बळीराजा पॅनेलने १३ पैकी १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवला. शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत हे या निवडणुकीचे किंगमेकर ठरले असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गौरीशंकर खोत यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पंढरी पारकर,माजी चेअरमन रवींद्र तेली,संतोष पाटील, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर, पुणाजी चव्हाण,आप्पा मोरये,रिमेश चव्हाण,सागर खोत,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

