*कोकण Express*
*तळेरे वाघाचीवाडीतील शेवरा देवीचा समरतान कार्यक्रम : विविध धार्मिक कार्यक्रम*
*भक्तांच्या नवसाला आणि माहेर वाशिनीच्या हाकेला धावणारी अशी महती*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे वाघाचीवाडी येथील श्री देवी शेवरा देवी देवस्थान येथे अभिषेक, ब्राम्हणपुजा व समरतान असे विविध धार्मिक कार्यक्रम 15 एप्रिल ला आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे वाघाचीवाडी ग्रामस्थ व मुंबई यांनी केले आहे.
दरवर्षी या देवीचा वार्षिक उत्सव होतो. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे काहिच कार्यक्रम झालेले नाहीत. त्यामुळे यावर्षी हे कार्यक्रम होणार आहेत. 15 एप्रिलला सकाळी 10 ते 12 वा. अभिषेक, ब्राम्हणपुजा तर दू. 1 ते 3 वा. महाप्रसाद आयोजित केला आहे. या देवीचा महिमा खुप मोठा असल्याचे तळेरे वाघाचीवाडी ग्रामस्थ सांगतात.
ते म्हणतात, आमचे पूर्वज सांगायचे देवीच म्हणणं आहे एका रात्रीत माझं मंदिर बांधा. त्या परिसरात मांसाहार वा मदिरा चालत नाही. यावर्षी या देवीच्या ठिकाणचे सुशोभिकरण करण्यात आले. ज्यावेळी कामाला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे फकत सव्वीस हजार रुपये होते. त्यानंतर वाडीतील ग्रामस्थ, मुंबई चाकरमानी, माहेरवाशिनी सर्वांच्या सहकार्याने जवळजवळ तीन लाख रुपये जमा झाले आणि संपूर्ण काम हे वाडीतील ग्रामस्थांनी केले. एकही मजूर बाहेरचा नाही. यातुन एकजुटीच प्रतीक पहायला मिळते. या देवीच्या परिसरातील कोणतीही वस्तू बाहेर नेता येत नाही.
आमच्या पिढीच भाग्य समजतो की आम्हाला तिची आज कामाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली.
जमीन मालकांचे चांगले सहकार्य मिळाले. यासाठी यावर्षी 15 एप्रिलला आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.