बोगस कुळ दाखवून जमीन हडप करण्याचे प्रकार कुडाळ तालुक्यातही

बोगस कुळ दाखवून जमीन हडप करण्याचे प्रकार कुडाळ तालुक्यातही

*कोकण Express*

*बोगस कुळ दाखवून जमीन हडप करण्याचे प्रकार कुडाळ तालुक्यातही..?*

*महसूल विभागाच्या भ्रष्ट कारभासंदर्भात सावंतवाडी सह कुडाळ तालुक्यातील देखील “त्या” साशंकित “कुळांची” सखोल चौकशी व्हावी*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सावंतवाडी तहसील यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश समोर आल्यानंतर कुडाळ तालुक्यात देखील अशाच प्रकारे बेवारस “कुळांची” बोगस प्रकरणे 2016 नंतर घडल्याची माहिती समोर आली आहे.मनसेने या
संदर्भात आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्ह्यातील नागरिक मनसेकडे अशा वादग्रस्त प्रकरणांबाबत कागदपत्रांनिशी माहिती देऊन संपर्क करत आहेत. कुडाळ तालुक्यात देखील अशी प्रकरणे समोर येत असल्याने अशा बेवारस “कुळांच्या” फसवणुकीचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांनी मनसेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेरील महसूल कर्मचारी ह्या रॅकेट मध्ये मोठ्या प्रमाणात सामील असल्याची चर्चा कानावर येत असून गरिबांच्या टाळूवरील लोणी खाणारे ह्यातील जिल्ह्यातील “झारीतले शुक्राचार्य” देखील समोर येणार आहेत. प्रांत/तहसील कार्यालय आवारातील सीसीटीव्ही दिशाहीन करून डंपर कारवाईविना सोडणे,वाळू/चिरे/खडी तस्करांकडून दरमहा “मलई” गोळा करणे,महसूल कडील दावे मॅनेज करणे असे प्रकार 2016 नंतरच वाढीस लागले असून जिल्हाबाहेरील महसूल कर्मचारी हे रॅकेट चालवत असून संपूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यातील “त्या” सर्व संशयित प्रकरणांची उच्चतरीय चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्यावतीने राज्याच्या महसूल मंत्र्याकडे पुराव्यानिशी करणार असून “ह्या” सर्व साशंकित प्रकारणात बोगस कुळ नोंदीने हातची जमीन गमावून भ्रष्टाचाराचे बळी ठरलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मनसे नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ग्वाही मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!