*कोकण Express*
*मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग मनसे राबविणार आरोग्य तपासणी सप्ताह*
*अद्ययावत यंत्रणेद्वारे तपासणी शिबिरांचा जनतेने लाभ घेण्याचे मनसेकडून आवाहन*
*सिंधुदुर्ग*
मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवासानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक,मुंबई व सिंधुदुर्ग मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी सप्ताह उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने संपूर्ण शारीरिक तपासणी,ऍक्युप्रेशर व फिजिओथेरपी तापाणीचा समावेश असून हृदय,मेंदू, रक्तवाहिन्या,लिव्हर,पचनसंस्था, मूत्रपिंड कार्यक्षमता, ECG रिपोर्ट आदी 40 घटकांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. दि.13 एप्रिल वेताळ बांबर्डे,14 एप्रिल पांग्रड कुडाळ तालुक,15 एप्रिल कणकवली,16 एप्रिल तारकर्ली,17 एप्रिल हडी,18 एप्रिल साळेल,19 एप्रिल कट्टा मालवण असा सप्ताह तपासणी शिबिर कार्यक्रम नियोजित असून जनतेने लाभ घेण्याचे आवाहन मनसेच्यावतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.