*कोकण Express*
*नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
नवीन कुर्ली प्राथमिक शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी केली गेली तसेच कोरोना काळात झालेल मुलांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे विचार विनिमय झाला.
या मेळाव्याचे उध्दाटन माजी सभापती सन्मा. मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच सन्मा. मनोज रावराणे यांनी विकासनिधीतून शाळेला बोअरवेल मारून दिली आणि शाळेच्या सभामंडपाचे सुशोभीकरण करण्यासाठी मदत केली म्हणून शाळा आणि ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनोज रावराणे आणि इतर शिक्षक यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
त्या प्रसंगी संतोष कानडे, जिवन रावराणे, शाळा व्यवस्थापन तथा नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, सचिव धीरज हुंबे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी मॅडम, तांबे मॅडम,अंगणवाडी शिक्षिका कामतेकर मॅडम, सदाशिव राणे सर,सचिन तांबे सर, नांदगावकर सर गावातील ग्रामस्थ शिवराम पोवार ,प्रकाश दळवी, कृष्णा परब,शांतराम पार्टे, अरुण पिळणकर, प्रिया दळवी, जनार्दन पोवार,अमित दळवी, महादेव कदम, आनंद सावंत, अनंत चव्हाण ,सदाशिव चव्हाण, सखाराम हुंबे , मंगेश मडवी,प्रदिप आग्रे तसेच इतर पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.