*कोकण Express*
*पोस्टल ग्रामीण डाक सेवकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी*
*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संघटनेच्यावतीने निवेदन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ऑल इंडिया पोस्टल ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्ग संघटनेच्या विभागाच्या वतीने केंद्रीय मंत्री लघु सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग संघटने तर्फे सदिच्छा भेट कसाल पडवे येथे मेडिकल कॉलेज मध्ये जावून प्रत्यक्ष भेट घेऊन पोस्टल ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न समस्याचे मागण्याचे निवेदन देऊन पाठ पुरावा करण्यासाठी विनंती केली
तसेच डाक सेवकांच्या मागण्या बाबत सर्विस्तर चर्चा करण्यात आली.देशातील 270000 हजार पोस्टल ग्रामीण डाक सेवकांची व्यथा माडण्यात आली.श्री राणे साहेबांनी सर्व व्यथा नीट लक्षात घेऊन लगेच आपल्या पी ए ना सूचना देऊन पोस्ट विभागाला लिहीण्याचे निर्देश दिले.
यावेळी लेखी मागण्याचे निवेदन दिले त्यात ग्रामीण डाक सेवकांना 12/24/36 चे प्रमोशन द्यावे ,10 लाख रुपये ग्रजुटी मिळावी ,परीक्षा न देता 15/20/25 वर्षे सेवा झाली त्यांना सरळ बढती देण्यात यावी ,5 लाखाचे वैद्यकीय विमा कवच देण्यात यावे,ग्रामीण डाक सेवकांना 180 दिवसाची रजा रोखीने देण्यात यावी , ग्रामीण डाक से सेवकांना 2000 किंवा 2500 हजार रुपये घर भाडे देण्यात यावे ,ग्रामीण डाक सेवकांना 10 ते15 हजार शैक्षणिक भता देण्यात यावा,ग्रामीण डाक सेवकांना वैद्यकिय सुविधा ESI,CGHS मिळण्याबाबत,ग्रामीण डाक सेवकांना कायम स्वरुपी खात्यात सामावून घावे .अश्या सर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष हरियाणा, उपाध्यक्ष श्री दिलीप गावडे, संघटनेचे सदस्य श्री भास्कर परब, श्री ज्ञानेश्वर आईर, सौ भारती नाईक, श्रीमती नीता बांदिवडेकर आणि संघटनेचे सचिव स्वतःश्री तुकाराम बाळकृष्ण गावडे होते. मी स्वतः संघटनेचा सचिव झाल्यापासून तीन महिने सतत कार्यरत राहून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला.
जिल्हातील सर्व ग्रामीण डाक सेवकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की सर्वांनी संयम ठेवा संघटित रहा संघटनेशी बांधील रहा सोबत रहा एक ना एक दिवस डाक सेवकांचा आपलंच विजय होईल अशी मला खात्री आहे असे सिंधुदुर्ग पोस्टल ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सचिव श्री तुकाराम गावडे ह्यांनी आवाहन केले आहे .

