*कोकण Express*
*आजगाव सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात…*
आजगाव सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.एकनाथ नारोजी यांच्या नेतृत्वाखाली १३ ही जागा बिनविरोध झाल्या. १२ जागा या शिवसेनेने आपल्याकडे राखत सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली.या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले संचालक एकनाथ नारोजी,सूरज केदार,दीपक बाळे, बाबुराव जाधव,गौरवी मसुरकर,जगन्नाथ परब,प्रतीक्षा पांढरे,गुंडू गोडकर,विश्वंनाथ आडारकर,अर्जुन पालव,सदानंद गवस,गंगाराम शेळके यांच्यासह शेखर आजगावकर, सुनील आजगावकर,काका बाळे, गजानन पांढरे,प्रवीण पालव,संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुपेश राऊळ यांनी सहकार क्षेत्रात राजकारण न करता बिनविरोध निवडी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.तसेच लवकरच खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक लावून सहकार क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

