*कोकण Express*
*पडवेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची भूमिपूजने*
आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फ़ंडातून पडवे मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख रु. पडवे डोंगरेवाडी येथे रस्त्यावर मोरी बांधणे निधी ३ लाख रु. पडवे शिर्केवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख या विकास कामांची भूमिपूजने रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. लोकांची मागणी असलेली महत्वाची कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, विभागप्रमुख नागेश ओरोसकर, बाळू पालव, पडवे उपसरपंच सीताराम पारकर, शाखाप्रमुख संतोष शिरवंडकर माजी सरपंच प्रभाकर गोसावी, दिलीप पडवेकर, रामचंद्र परब, संजय परब , लाडोजी परब ,बुधाजी परब ,विजय परब ,नाना नाडकर्णी ,संतोष सावंत ,मनिष पारकर सुनील परब ,बबन तारापुरे, कांचन सावंत, रसिका पार्टे, बाळा राऊत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

