हळवल परबवाडी रस्त्याचे सुशांत नाईक यांच्याहस्ते उद्घाटन

हळवल परबवाडी रस्त्याचे सुशांत नाईक यांच्याहस्ते उद्घाटन

*कोकण Express*

*हळवल परबवाडी रस्त्याचे सुशांत नाईक यांच्याहस्ते उद्घाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हळवल परबवाडी शिवडाव मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली होती. गेली दोन वर्षे हळवल परबवाडी व भाकरवाडी वासीयांना या खड्डेमय रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत भास्कर राणे यांच्या अथक प्रयत्नातून आज हळवल- परबवाडी-शिवडाव मुख्य रस्त्याचे जिल्हा बँक संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते कणकवली- हळवल -परबवाडी- शिवडाव मुख्य रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भास्कर राणे, रवींद्र परब, मारुती सावंत, माजी सरपंच अस्मिता परब, रामचंद्र परब, प्रकाश परब, गणपत परब, बाबू महाडेश्वर (सामाजिक कार्यकर्ते), मंगेश ठाकूर, राजन ठाकुर, बाळकृष्ण घोगळे, गणेश राणे, दिलीप परब, गणपत तानीवडे, गणपत परब, प्रशांत प्रकाश परब, अशोक परब, प्रकाश घोगळे, जनार्दन डोबकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यामुळे समस्त हळवल वासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!