फोंडाघाट मध्ये शिवसेना युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

फोंडाघाट मध्ये शिवसेना युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

*कोकण Express*

*फोंडाघाट मध्ये शिवसेना युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यात फोंडाघाट मध्ये अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती भाजपा कडून दिली. आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला हा एक प्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे. नितेश राणे यांनी फोंडाघाट मधील अनेक तरुण शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश देत त्यांचे स्वागत केले. यावेळी गणेश लाड, पांडुरंग लाड, अनिकेत लाड, गोरक्षनाथ लाड, सूर्यकांत लाड, विनायक लाड, समीर लाड, तुषार लाड, गौरव लाड, आदित्य लाड, संतोष बागवे, साहिल लाड, संजय लाड, सुशांत लाड, नागेश लाड, साहिल पवार, भावेश लाड, चिन्मय लाड, अजय लाड, नागेश गुरव, प्रथमेश लाड, राजेंद्र बागवे, अनिश गुरव, अनंत लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी सभापती मनोज रावराणे, बबन हलदिवे, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन चिके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!