*कोकण Express*
*तीन पत्ती जुगार खेळणारे सहा जण मुद्देमालासह ताब्यात*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
निवती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी १० एप्रिल रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करमळगाळु शेतमळ्यात टाकलेल्या धाडीमध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना सुमारे ८७ हजार ७५० रुपयांच्या मुद्देमाला सह ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवती पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक मारुती जगन्नाथ कांदळगावकर यांनी दिलेल्या फिर्यादि मध्ये असे म्हटले आहे की, त्या शेतमळ्यात पोलीसांना मिळालेल्या माहिती नुसार धाड टाकली असता तेथे काहीजण जुगाराचे साहित्य सोबत बाळगून तीन पत्ती नावाचे जुगार खेळत असताना दिसून आले. त्यात अनिकेत देवदास गावडे (वय 24) पिंगळी मापसेकर तिठा, निसार आदम शेख (वय 50) पिंगुळी गोंधळवाडी, अभिमन्यू मधुकर गावडे (वय 34) वाडीवरावडे क्षेत्रफळवाडी, प्रवीण यशवंत गावडे (वय 41) पिंगुळी म्हापसेकर तिठा, नितीन श्रीधर पाटकर (वय 38) पिंगळी आणि राजन मंगेश वाळके (वय 48) म्हापसेकर तिठा पिंगुळी यांचा समावेश होता. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दोन मोटरसायकल मिळून सुमारे ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल सापडला तो जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वारंग यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. फौ. व्ही एन नाईक, पो.हे. गोसावी, पो.हे.कॉ. एस ए डिसोजा, पो.हे. का. बी एस अंदुरलेकर, पो.हे. का. एस बी नाईक, चालक पो.हे.कॉ. गावडे, पो. ना. ऐ सी किनळेकर या पोलीस पथकाने ही कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो.फौ.के आर नाईक हे करीत आहेत.