*कोकण Express*
*1 मे ला सर्व जातींच्या वधुवरांचा मेळावा कणकवलीत घेण्याचा समन्वय समितीचा निर्णय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सर्व जातींच्या प्रतिनिधींची बैठक येथील श्री.भवानी सभागृह कणकवली येथे नुकतीच पार पडली यावेळी सुमारे 10 जातींच्या संघटनांचे पदाधिकारी व वधुवर मंडळाचे प्रतिनिधि उपस्थित होते.त्यामध्ये सभेचे आयोजक श्री.चंद्रशेखर उपरकर,एस.टी.सावंत,विलास गुढेकर, नंदकुमार आरोलकर,महेश काणेकर, सखाराम सपकाळ, सौ वैभवी सावंत,दिलीप हिंदळेकर,सतीश पोयेकर, सदाशिव गुरव,सत्यविजय जाधव,बापू महाडिक, सुशील सावंत, नितीन तळेकर इत्यादी प्रमुख प्रतिनिधि उपस्थित होते.
यावेळी वधु वरांच्या अनेक समस्यांबाबत आणि लग्न जुळविताना येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही वधुवर सूचक मंडळाकड़ून होणारी आर्थिक फसवणूक,पालकाना होणारा मानसी त्रास,मुला मुलींच्या वाढत्या अपेक्षा वगैरे विषयांवर अनेकांनी बैठकीत चिंता व्यक्त केली.
चर्चेअंति “सर्व जाती वधुवर सूचक समन्वय समिती “स्थापन करण्यात आली.या समन्वय समिती तर्फे येत्या 1 में 2022 रोजी कणकवली येथे बस स्टैण्ड समोरील”सुमनराज ट्रेड सेंटर टेरेस हॉल येथे सर्व जातींच्या प्रथम वरवधू,घटस्फोटित,विधुर,विधवा,अपंग अशा सर्वांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत नोंदणी व प्रत्यक्ष पसंती मेळावा घेण्यात येणार आहे.तसेच केवळ पालकानी उपस्थित न रहाता वधु अथवा वर व सोबत एकाच पालकाना उपस्थित रहाता येईल. नोंदणी फी फक्त 200/-रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सदरील समन्वय समितिची पुढील बैठक शनिवार दिनांक 23 एप्रिल 22 रोजी सकाळी 10 वाजता भवानी सभागृह तेलिआली, कणकवली येथे होणार आहे.त्यासाठी संपर्क श्री चंद्रशेखर उपरकर,9022621723 या क्रमांकावर करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरील बैठकीस गाबीत,मराठा,वैश्य वाणी,कोष्टी,तेली,सुतार,गुरव,शिंपी, चर्मकार, कुंभार,समाजातील पदाधिकारी उपस्थित होते अजूनही ज्या जातीच्या प्रतिनिधिना येता आले नाही त्यांनी सहभागी व्हायचे असेल त्यांनीही सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.