*कोकण Express*
*आय एन एस विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा किरीट सोमय्यावर दाखल करण्याची शिवसेनेची मागणी*
*वेंगुर्ले पोलिसांंन सेनेने दिले लेखी निवेदन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
आय. एन. एस. विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका. अशी मागणी वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी लेखी निवेदनाद्वारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
वेंगुर्ले पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांना तालुका शिवसेनेतर्फे सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनात सन 2013 मध्ये आय.एन.एस. विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या याने मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शविल्याने किरीट सोमय्या पुढे आला आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वेस्थानकावर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला. आय.एन.एस. विक्रांत हा देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सरळ असते दान केले नेवीनगर मध्ये राहणारा नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपये दिले. या रकमेचे किरीट सोमय्याने काय केलं ते देशाला समजायला हवा ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता. मात्र समाजाने गोळा केलेली रक्कम राज्य भवन आला मिळाली नसल्याचं आर.टी.आय. मधून समोर आला आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केली आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.
किरीट सोमय्याने आय.एन.एस. विक्रांत या नावाखाली गोळा केलेल्या निधीचा काय झालं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचविण्यासाठी देणगी दिली. ती राजभवनाने आपल्याला किरीट सोमय्या यांच्याकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचे माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.
किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही मग तो कोणाच्या खिशात गेला. हा पैसा कोणी खाल्ला याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्याने अंदाजे 100 कोटीचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे किरीट सोमय्याला राज्यात काय देशातही राहण्याचा अधिकार नाही. या देशात रहायची जागा तुरुंगात असायला हवे. महाराष्ट्रातील तसेच देशातील जनता या प्रश्नाचे उत्तर किरीट सोमय्या यांचेकडून तसेच भाजपकडून मागत आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहर प्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, कार्मिस आल्मेडा, दाभोली सरपंच उदय गोवेकर, संदीप केळजी, अभिनय मांजरेकर, सुनील वालावलकर, कौशल मुळीक, वेदांत वाडेकर, निखील नाईक, आनंद बटा आदींचा समावेश होता.