गिर्ये कॅन्टीन प्रकाशात उजळली

गिर्ये कॅन्टीन प्रकाशात उजळली

*कोकण Express*

*गिर्ये कॅन्टीन प्रकाशात उजळली*

*भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते हायमास्ट टॉवर चे लोकार्पण*

*देवगड ः प्रतिनिधी*

केंद्रीय मंत्री नामदार श्री नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज देवगड तालुक्यातील गिर्ये कॅन्टीन येथे हायमास्ट टॉवर चे लोकार्पण भाजपा चे जिल्हा सरचिटणीस सन्मा. आरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते पार पडले.
कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब यांच्या विकास निधीतून सदर हायमास्ट टॉवर गिर्ये कॅन्टीन येथे बसविण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात आज केंद्रीय उद्योग मंत्री सन्मा. नारायणराव राणे साहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा होत आहे. राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभदिनाचे औचित्य साधून आज या लाईट टॉवर चे लोकार्पण करण्यात आले.
विभागातील कर्तव्यनिष्ठ नेते आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मा. आरिफभाई बगदादी यांनी आज सायंकाळी उदघाटन प्रसंगी सदर हायमास्ट चा स्वीच ऑन करताच ग्रीर्ये कॅन्टीन, आणि ग्रामपंचायत समोरील सर्व परिसर लख्ख प्रकाशात उजळून निघाला.
मागील अनेक वर्षातील या हायमास्ट टॉवर बाबतची ग्रामस्थांची मागणी सन्मा. अरिफभाई यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार नितेश राणे साहेब यांनी आपल्या विकास निधीतून पूर्ण केली याबाबत गिर्ये गावातील समस्थ नागरिक समाधान आणि आमदार राणे साहेबांप्रती शतशः धन्यवाद व्यक्त करीत आहेत.
आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सन्मा. आरिफभाई बगदादी, गिर्ये सरपंच सन्मा. रुपेश गिरकर, जि. प. माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी, उद्योजक सचिन गिरकर, प्रल्हाद घाडी, स्वप्नील पुजारे, संजय गिरकर, शरद घाटये, संतोष गिरकर, दिलीप गिरकर, बबन पवार, बाळा पवार तसेच गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!