*कोकण Express*
*गरीब जिल्ह्यांच्या उल्लेखात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव, परंतु ती स्थिती आपण बदलली…*
*स्पर्धा केल्याशिवाय विकास नाही या मताचा आपण…*
*वाढदिवस कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे भावनिक उद्गार;कार्यकर्त्यांच्या सोबत साजरा झाला वाढदिवस*
*ओरोस ः प्रतिनिधी*
या सभागृहातून बाहेर जाताना निर्धार करून जा. आपण आत्मनिर्भर करणार स्वतःला व देशाला. प्रेम द्यावं लागतं. मिळवावे लागत. ते टिकवावे लागते. स्वतःला कमी लेखणारी माणसे आवडत नाही. मी पदे दिलेली सर्व माणसे आज उपस्थित असतीतर असे पाच सभागृह पुरले नसते. परंतु काही कटू निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे काहीजण दुखावतात. नुसते वय वाढून चालत नाही समाजसेवा, समाजकार्य, विकास केल्याने तुमचे नाव झाले पाहिजे. तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम करता म्हणून मला लोकप्रिय नेता म्हणून नावलौकिक मिळाले आहे. यापुढे अशीच साथ द्या असे आवाहन केंद्रीयमंत्री मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये त्यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने केंद्रीयमंत्री राणे यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात शरद कृषी भवन येथे साजरा झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला सौ नीलम राणे, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्हा निरीक्षक आ प्रसाद लाड, इचलकरंजी आ प्रकाश कवाडे, आ नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, विशाल परब, डॉ मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, संजू परब, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, रणजित देसाई, दादा साईल, संतोष वालावलकर, नीता राणे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आ कवाडे यांनी फेटा बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
७१ आंब्याचा हार घालून विशाल परब व मित्रमंडळाने त्यांचे अभिष्टचिंतन केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व संचालक, अधिकारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँकेच्या सिंधू उद्योग सहयोग या योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पुढे बोलताना केंद्रीयमंत्री राणे यांनी, गेली ३२ वर्षे सिंधुदुर्गात राजकारणात आहेत. अनेकजण मित्र, सोबती व सहकारी म्हणून राहिले. गरीब जिल्ह्यांच्या उल्लेखात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव होते. परंतु ती स्थिती आपण बदलली. स्पर्धा केल्याशिवाय विकास होत नाही. या मताचा आपण आहोत.
आ कवाडे यांनी इचलकरंजीत केलेला बदल पहा. पंतप्रधान, उपराष्ट्रपती, अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आपल्या खात्याचा उल्लेख व अभिनंदन केले. राज्याचे बजेट चार लाख कोटी आहे. तर माझ्या एकट्याचे बजेट साडेसात लाख कोटी आहे. निंदा, नालस्ती करणे हेच विरोधकांचे काम आहे. सेवा करा, विकास करा, उद्योग करा एमएसएमई तुमच्या पाठीशी आहे. जिल्हा आपल्याला उद्योजक बनवायचा आहे. त्यासाठी तुम्ही येथून निर्धार करून बाहेर पडा, असे आवाहन मंत्री राणेंनी शेवटी केले.