*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप सिंधुदुर्गचा पोईप येथील कातकरी समाज बांधवांना मदतीचा हात..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप सिंधुदुर्ग तर्फे आज पोईप येथील कातकरी समाजातील ज्या बांधवांच्या झोपड्या जळून खाक झाल्या त्यांना मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, भांडी यांचे वितरण करण्यात आले.श्रमदानातून जळालेल्या झोपड्यांचे अवशेष गोळा करून साफसफाई करून पुन्हा झोपड्या उभारण्यासाठी सहकार्य करण्यात आले.