*कोकण Express*
*शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा वैभववाडी राष्ट्रवादीकडून निषेध*
*वैभववाडी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काॕग्रेस पाटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत संस्कृतीवर झालेला हल्ला आहे.या हल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॕग्रेस वैभववाडी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
देशात महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य म्हणून ओळख आहे.आदरनीय शरद पवार हे देशाचे नेते आहेत.त्याच्यासारख्या महान नेत्याच्या घरावर हल्ला ही अत्यंत निंदनीय घटना आहे.या हल्यामागील सूञधार व हल्लेखोरांवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी.अशी मागणीही रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपञाद्वारे केली आहे.

