विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून सुरू

विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून सुरू

*कोकण Express*

*विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून सुरू…*

*सर्वसामान्य जनतेच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध आहे*

*शिवसेना नेते संदेश पारकर*

*देवगड ः प्रतिनिधी*

शिवसेना या शब्दातच ताकद असून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे .सामान्य जनतेच्या विकासकामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व शिवसेनेचे पूर्वीचे वैभव निर्माण करण्याकरता शिवसेना आक्रमक झाली असून या विकास कामांचा धडाका देवगड तालुक्यातील मोंड गावच्या विकास कामापासून झाला आहे. सर्वसामान्य जनतेला शक्ती व नेतृत्व हे शिवसेनेने दिले असून सर्वसामान्य जनतेशी विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहिली म्हणुनच कोकणातुन अनेक नेतृत्व ही शिवसेनेमुळेच उदयास आली .निव्वळ सत्तेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी पद न घेता विकासाची जबाबदारी ही शिवसेना घेते. त्यामुळे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी बरोबरच लोकसभा,विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेने उभे राहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९९६ कोटींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनते करता मंजूर झाले आहे. अशा पद्धतीची विकास कामे आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्णत्वास जातील. असा आत्मविश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मोहन येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा शुभारंभ प्रसंगी बोलताना केला. यावे आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,तालुकाप्रमुख विलास साळसकर ,मिलिंद साटम देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभु सरपंच शामल अनभवणे उपसरपंच अभय बापट, माजी उपसभापती संजय देवरुखकर, वा अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मोंड येथील ३० लाख रु खर्चाच्या मौज मोंड फणसकोंड नळयोजनेजवळ बंधारा बांधणे, या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ सतीश सावंत,संदेश पारकर सरपंच शामल अनभवणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच मौजे मोंड चिंचवाडी,ते मोंड हॉस्पिटल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या ७५ लाख रु खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ जिल्हा बँक माजी अध्यक्ष नियोजन समिती सदस्य सतीश सावन्त यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात उपस्थित मान्यवर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या मान्यवर समवेत विभाग प्रमुख अमोल लोके,संदीप डोळकर रमाकांत राणे,फरीद काझी,ग्रा प सदस्य गौरी मोंडकर,गुरुनाथ मोंडकर,विभाग प्रमुख सायली घाडी,अस्मिता कोयंडे डॉ शरीफ गिरकर,, प्रसाद कुळकर्णी प्रदीप कोयंडे, बाळा कोयंडे,ग्रामसेवक जयसिंग सावंत,बापू मुणगेकर,प्रशांत चौगुले,अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.या निमित्ताने मोंड येथील ग्रामस्थांनी येथील खाडीपत्रातील गाळ उपसणे, तसेच बीएसएनएल टॉवर ची आग्रही मागणीचे निवेदन जिल्हा प्रमुख संजय पडते व अन्य मान्यवर यांचेकडे दिले या वेळी या समस्या लवकरात लवकर खासदार व पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!