*कोकण Express*
*कणकवली शहरातील मोरये बिल्डिंग बाबतीत भाडेकरूंनी संदेश पारकर यांच्यासोबत घेतली पोलिस अधिक्षकांची भेट*
26 मार्च 2022 रोजी मोर्ये बिल्डिंग बाबतीत जे काही घडले त्याबाबत आज बिल्डिंग मधील भाडेकरुंनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत निवेदन दिले. याप्रकरणी कणकवली पोलिसांच्या तपासकामावर संशय व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, विजयालक्ष्मी धुमाळे, जयेश धुमाळे, डॉ.सुनिल रेवडेकर, सौ.रेवडेकर, अलका कदम, दादा म्हापसेकर आदी उपस्थित होते.