कणकवलीतील इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करावी

कणकवलीतील इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करावी

*कोकण Express*

*कणकवलीतील इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करावी*

संदेश पारकर यांची मंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कणकवलीतील तीन मजली इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याबाबत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन एसआयटी गठीत करण्याची मागणी केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेऊन कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संदेश पारकर यांना दिले.

याबाबतचे निवेदन मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिले असल्याची महिती संदेश पारकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!