तिर्लोट गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ

तिर्लोट गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ

*कोकण Express*

*तिर्लोट गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ*

*300 मीटर लांबीच्या रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते*

तिर्लोट गावातील मोहुळवाडी ते भाटवाडी या 300 मीटर लांबीच्या रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कर्तव्यदक्ष नेते तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मा. अरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते पार पडले.
बहुप्रतिक्षित असा मोहुळवाडी ते भाटवाडी रस्ता तिर्लोट ग्रामस्थ व आंबा बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्याच्या खडीकरण-डांबरीकरणाचे काम देवगड चे कर्तव्यदक्ष आमदार नितेश राणे साहेब यांच्या विकास निधीतुन पूर्ण होत आहे.
आज अतिशय जल्लोषात या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले, या प्रसंगी तिर्लोट गावाचे सरपंच राजन गिरकर, उपसरपंच प्रताप तिर्लोटकर, माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी, सोसायटी चेअरमन सुधाकर दळवी, जेष्ठ नेते रमाकांत घाडी, भाजपा तालुका सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, ग्राम. पं. सदस्य दीपक जुवाटकर, बाबू घाडी, लुकाजी तिर्लोटकर, शक्ती केंद्र प्रमुख अनिल तिर्लोटकर तसेच तिर्लोट मधील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्तीत होते. या विकास कार्याबाबत तिर्लोट येथील उद्धयोजक श्री बबनशेट सारंग यांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर रस्त्याच्या विकास कामाबाबत तिर्लोट ग्रामस्थांमधून अतिशय समाधान व्यक्त केले जात असून , सन्मा नितेश राणे साहेब आणि अरीफभाई बगदादी यांचे शतशः आभार तिर्लोट ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!