*कोकण Express*
*सावंतवाडीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करा*
*मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवांडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यात मोठ्याप्रमाणात अवकाळी पाऊस पडून मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती आदी शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तालुक्यातील तालुका कृषीअधिकारी यांच्या जवळ अतिरिक्त अन्य तालुक्याचा कार्यभार त्यांचे सहाय्यक कृषी अधिकारी आपले तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ सूचना द्याव्यात वरील सर्व पिकांचे पंचनामे तातडीने करा तसेच काही घरांचे ही नुकसान झालेले आहे जुलै २०२१ रोजी पावसाळ्यात पूर आलेला या पुरहानी मध्ये अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे परंतु अजूनपर्यंत लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही तसेच पुरहानीत सर्वाधिक नुकसान सावंतवाडी तालुक्यात झाले आहे त्याचीही नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेले नाही शेतकरी प्रत्येक वेळी निधीसाठी आपल्या कार्यालयात हेलपाटे मारत असतो दिनांक ०७ मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रासाठी १२५०७.०१ रुपये निधीसाठी शासन मंजुरी देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तुटपुंजी निधी फक्त २०१.८२ हजार मात्र निधी देण्यात आला आहे हा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाल्याच्या नंतर सावंतवाडी तालुक्यात लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालय याठिकाणी लावण्यात यावा त्याच प्रमाणे चक्रीय वादळ पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारचे महाराष्ट्राला एनडीआरएफ मधून १०५६,३९ कोटीचे आर्थिक सहाय्य जारी झाले आहे आम्हांला खात्री आहे की आपण या दोन्ही गोष्टीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही कराल.