नरडवे धरणग्रस्तांचा ठेकेदाराला दणका ; सुरू असलेले काम पाडले बंद

नरडवे धरणग्रस्तांचा ठेकेदाराला दणका ; सुरू असलेले काम पाडले बंद

*कोकण Express*

*नरडवे धरणग्रस्तांचा ठेकेदाराला दणका ; सुरू असलेले काम पाडले बंद…*

*अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच धरणग्रस्त भूमिका स्पष्ट करणार…*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

गेले काही दिवस सुरू असलेली नरडवे धरणाचे काम नरडवे धरणग्रस्त समन्वय समिती व मुंबई संलग्न स्थानिक कमिटी च्या माध्यमातून बंद करण्यात आले अशी माहिती या समन्वय समितीचे संतोष सावंत यांनी दिली. अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने धरणग्रस्त मधून तीव्र संतापाचे वातावरण आहे. यातच अनेक प्रलंबित मागण्या सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने धरणग्रस्तांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. 3 एप्रिल पासून ठेकेदाराने काही प्रमाणात काम सुरू केले होते. मात्र स्थानिक समन्वय समितीच्या माध्यमातून ठेकेदाराच्या मनमानीला चाप लावण्यात आला. तसेच यासंदर्भात आज बैठक घेत धरणग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. यावेळी तेथील स्थानिक कमिटीचे अध्यक्ष गणेश सहदेव ढवळ, सचिव प्रभाकर ढवळ, मुंबई उपाध्यक्ष जगदीश पवार, प्रकाश सावंत,नित्यानंद सावंत,अशासकीय प्रतिनिधी संतोष शिवराम सावंत, व ईतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती संतोष सावंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!