*कोकण Express*
*नांदगाव सोसायटी निवडणूक भाजपने केला प्रचाराचा शुभारंभ*
*भाजप पुरस्कृत 13 ही जागा जिंकण्याचा निर्धार*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव गृप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणूक ही 1944 च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार असून 13 जागांसाठी 26 अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. भारतीय जनता पार्टीने कालच रात्री प्रचाराचा शुभारंभ नांदगाव वाघाची वाडी येथील गीता भवन सभागृहात आयोजित सोसायटी सभासद कार्यकर्ते यांच्या उपस्थित केला आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव ही एकूण 6 गावातील सभासद यांची सोसायटी असून या सोसायटी निवडणूकीकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात नांदगाव सोसायटी ही 6 गावातील मिळून एकत्र सोसायटी असून 13 ही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, संदिप सावंत, नांदगाव भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, सुनिल गावकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी उपसभापती लाला मेस्त्री, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे, ओटव उपसरपंच राजेश तांबे, दत्ता काटे आदी मान्यवर मंडळी तसेच सोसायटी 6 गावातील सभासद कार्यकर्ते उपस्थित होते. 13 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 1016 पैकी 870 सभासद मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 146 सभासद मतदार हे अपात्र ठरविण्यात आले आहेत. एकूण १३ जागांसाठी 26 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात शिवसेनेच्या व भाजपच्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात या निवडणुकीत नांदगाव गावाबरोबरच ओटव, माईण, सावडाव, तोंडवली, बावशी या गावांचाही या सोसायटीत समावेश आहे. सदर सोसायटी स्थापन झाल्यापासून निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र 2012 साली झालेल्या सोसायटी निवडणूकीत बाकी सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका बिगर कर्जदार गटांतील एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया झाली होती. यानंतर गेल्या पाच वर्षांच्या मागे संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली होती. पण आता होत असणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे मोठे नेते प्रचाराला उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.