*कोकण Express*
*तिर्लोट येथे विकास कामांचा शुभारंभ*
*रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मा. अरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते*
तिर्लोट भाकरवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस सन्मा. अरिफभाई बगदादी यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदरचा रस्ता 600 मीटर लांबीचा असून, माजी राज्यमंत्री तथा आमदार भाई गिरकर यांच्या विशेष निधीतून आणि आमदार नितेश राणे साहेब यांच्या सहकार्यातून या रस्त्याचे डांबरीकरण होत आहे.
या भूमिपूजन प्रसंगी सन्मा. अरिफभाई बगदादी यांच्या समवेत सरपंच राजन गिरकर, सोसायटी चेअरमन सुधाकर दळवी, जेष्ठ नेते रमाकांत घाडी, ठाकूरवाडी सरपंच वलीद ठाकूर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पद्माकर घाडी, सूरज घाडी, रवींद्र घाडी, लुकाजी तिर्लोटकर , तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रस्त्याच्या डांबरीकरणामूळे तिर्लोट येथील ग्रामस्थ अत्यंत आनंदात असून, आमदार नितेश राणे, आमदार भाई गिरकर आणि अरिफभाई बगदादी यांना ग्रामस्थांकडून शतशः धन्यवाद दिले जात आहेत.