सावंतवाडी तालुक्‍यातील अवैध उत्खनना विरोधात मनसे आक्रमक

सावंतवाडी तालुक्‍यातील अवैध उत्खनना विरोधात मनसे आक्रमक

*कोकण Express*

*सावंतवाडी तालुक्‍यातील अवैध उत्खनना विरोधात मनसे आक्रमक…*

*प्रांताधिकार्‍यांना निवेदन; पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास मोर्चा काढू…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

तालुक्यात सुरू असलेल्या अवैध जांबा दगड व क्वारी उत्खननावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान येत्या पंधरा दिवसात यावर ठोस भूमिका न घेतल्यास मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री.पानवेकर यांना निवेदन दिले.

यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार, जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टगंसाळी, उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर, निलेश पेंडुरकर, विश्वनाथ राऊळ, विष्णू वसकर, मंगेश वरक, भास्कर सावंत, आकाश परब, साहिल पवार आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील सोनुर्ली, वेत्ये, निगुडे, विलवडे, डेगवे, पनवळ,तळवणे, सातार्डे, साटेली या व इतरही अनेक गावांमध्ये आपल्या विभागामार्फत तसेच माननीय जिल्हा खनिकर्म अधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत काळा दगड व जांबा दगड तसेच क्रशर साठी काही ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. व काही ठिकाणी अनधिकृतपणे जांभा दगड, काळा दगडाच्या खाणी चालू आहेत. व क्रशर प्लांट सुद्धा बसविण्यात आले आहेत. नियमापेक्षा खोलवर भु सुरुंग स्फोट घडवून व सहा मीटर पेक्षा खोल खोदून नियमबाह्य उत्खनन केले बाबत भूसुरुंग यामुळे घरांना तडे गेले तसेच भूसुरुंग यामुळे विहिरींना तडे गेले, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत लुप्त झाले अशा प्रकारच्या अनेक तक्रारी संबंधित गावांमधून ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनापर्यंत वारंवार पोचविल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अशा अवैद्य उत्खननावर तात्काळ कारवाई करा, येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास आपल्या कार्यालयावर मोर्चा आणू, असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!