*कोकण Express*
*डोंबिवलीत रंगणार गानसरस्वती किशोरीताई आमोणकर स्मृती महोत्सव !*
*कासार्डे ः संजय भोसले*
डोंबिवलीत दर वर्षी कुलकर्णी परिवार आणि इंद्रधनुष फाउंडेशन तर्फे आयोजित होणारा गानसरस्वती किशोरी आमोणकर मोहत्सव तब्बल दोन वर्षांनी पुन्हा येत्या शनिवारी दि.९ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात “कलर्स ऑफ व्हायलीन” हा वेगवेगळ्या संगीताचा अविष्कार असणारा एक अनोखा प्रयोग रायकर व्हायोलिन अकॅडमी चे विद्यार्थी सादर करतील आणि दुसऱ्या सत्रात स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकर यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना प्रसिद्ध तबला वादक पंडित विश्वनाथ शिरोडकर हे साथ देतील. हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता हार्मनी हॉल, तिसरा मजला डोंबिवली जिमखाना रोड, डोंबिवली (पू) येथे विनामूल्य होणार असून ह्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना सांगीतिक कार्यक्रमात सर्वांनी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन कुलकर्णी परिवार आणि इंद्रधनुष फाउंडेशन यांनी केले आहे.