राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS) १९ जून २०२२रोजी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS) १९ जून २०२२रोजी

*कोकण Express*

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा (NMMS) १९ जून २०२२रोजी*

*कासार्डे ः  संजय भोसले*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. 1 .यांचेमार्फत घेतल्या जाणार्‍या ,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ,विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने (NMMS) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण महत्व आहे .ही परीक्षा इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या आणि इ.७वी मध्ये किमान ५५% गुण sc/st साठी ५०%गुण प्राप्त असलेल्या कोणत्याही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देता येते. तसेच इयत्ता आठवी मध्ये झालेल्या अभ्यासक्रमावरच आधारित सदरची परीक्षा घेतली जात असल्याने वेगळ्या अभ्यासक्रमाची आवश्यक्ता नाही.मात्र या परीक्षेला बसण्यासाठी उत्पन्नाची अट असल्याने साधारणतः ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 रू.पेक्षा कमी आहे.आणि जे तहसिलदार /तलाठी यांचा २०२१/२०२२ या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देतील अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS ला यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला 1000/- म्हणजे वार्षिक 12000/— येवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे इयत्ता नववी ते बारावी पर्यंत, अशी एकूण 48000/—रुपये मिळते. ही शिष्यवृत्ती मिळाल्या नंतर मात्र निकालात सातत्य राखणे आवश्यक आहे. म्हणजे इ. ९वी व ११वी परिक्षेत किमान ५५%गुण sc /st साठी ५०% गुण मिळवणे आवश्यक.तर इ.१०वी मध्ये किमान ६०%गुण sc/st साठी ५५% गुण मिळणे आवश्यक. शिवाय बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चित फायदा होणार आहे.
या परीक्षेसाठी दोन पेपर असतात १) SAT:— म्हणजे शालेय क्षमता चाचणी .— ही सामान्यतः सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामध्ये सामान्य विज्ञान ( 35 गुण ) समाजशास्त्र ( 35गुण ) आणि गणित (20 गुण) असे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात.आणि
२) MAT- म्हणजे मानसिक क्षमता चाचणी.:—ही मानसशास्त्रीय चाचणी असून यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पना वर आधारित 90 बहुपर्यायी ,वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
या परीक्षेची ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरण्यासाठी दिनांक 06/04/2022 ते 26 /04 /2022 पर्यंत प्रवेश शुल्क 100 रुपये आहे . विलंबाने भरण्यासाठी म्हणजे दिनांक 27/04/2022 ते 01/05/2022 पर्यंत 200 रुपये आहे. तर अति विलंबाने म्हणजे शाळा किंवा संस्था जबाबदार असेल तर दिनांक 02/05/2022 ते 06/05/2022 पर्यंत 300 ते 400रुपये भरावे लागतील .ही आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरायची असल्याने https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेत स्थळावरून त्या त्या शाळेतून भरावयाची आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी ,केंद्रीय विद्यालया मध्ये शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालया मध्ये शिकणारे विद्यार्थी, तसेच शासकीय वसतीगृह मधील सर्व सोयी-सुविधा घेणारे आणि सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी मात्र या परिक्षेला बसू शकणार नाहीत. किंवा त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.अधिक माहीती साठी परिपत्रक पहावे अथवा शाळेशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!