शंकर सावंत यांचे निधन

शंकर सावंत यांचे निधन

*कोकण Express*

*शंकर सावंत यांचे निधन*

*कासार्डे: संजय भोसले*

तळेरे चाफार्डेवाडी येथील शंकर शांताराम सावंत (वय 50 ) यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने बुधवारी निधन झाले. मुळचे हरकुळ येथील असलेले सावंत हे बरीच वर्षे तळेरे येथे वास्तव्यास होते. ते बाळा सावंत या नावाने परिचित होते. गेल्या दोन दिवसांपासुन ते पडवे येथील रुग्णालयात दाखल होते.

सुमारे 25 वर्षे ते चालक म्हणून काम करत होते. तळेरे दशक्रोशीतील शालेय मुलांना वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल मध्ये सोडण्याचे काम गेली अनेक वर्षे करत होते. तळेरे येथे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार असुन त्यांच्या मुळ गावी हरकुळ येथे अंत्यविधी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!