निराधार महिलेस दिला मदतीचा हात

*कोकण Express*

*निराधार महिलेस दिला मदतीचा हात*

*फोंडाघाट  प्रतिनिधी*    

नेहमीच समाजसेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या फोंडा घाट महिला शिवसेना कार्यकर्त्या सौ.माधवी दळवी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौ.नैना साटम आणि राजा साटम यांनी गेली दोन तीन दिवस फोंडाघाट भागात  वावरणाऱ्या अंदाजे ४० वयाच्या निराधार महिलेस फोंडाघाट पोलिसांच्या सहकार्याने आसरा मिळवून दिला याबाबत संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे
माणसाला सर्वसामान्यपणे आपल्या व्यवहारी जगात जगताना चांगले काम करण्याची,आणि आपल्यातील माणुसकी दाखवण्याची संधी देव देत असतो,मात्र काही माणसे बघ्याची भूमिका घेतात तर काही जण आपल्या कडे मदत करण्याजोगे काहीही नसताना निव्वळ दुसऱ्यांसाठी चांगले करण्यासाठी धडपडत असतात अशाच प्रकारे फोंडाघाट विभागात मागील दोन तीन दिवसांपासून अंदाजे ४० वर्षाची एक अनाथ माहीला वावरत होती,मिळेल ते खाऊन रस्त्याच्या कडेला पडून राहत होती हि गोष्ट येथील शिवसेना महिला कार्यकर्त्या सौ.माधवी दळवी यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी आपल्या सोबत सौ.नैना साटम आणि राजा साटम याना घेऊन ताबडतोब त्या निराधार महिलेजवळ धाव घेतली.तिची विचारपूस केल्यानंतर ती बंगाली भाषा बोलत असल्याचे लक्षात आले,यानंतर मोबाईल वरून फोंडाघाट आऊटपोस्ट चे पोलीस मुल्ला आणि राऊळ याना याबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनीही वेळ न काढता त्याठिकाणी येऊन याबाबत वरिष्ठाना कल्पना दिली मात्र या  महिलेबाबत कोणता निर्णय घ्यावा याबाबत संभ्रमात पडलेले आणि नुकताच कणकवली तालुका पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज घेतलेले  पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी त्या निराधार महिलेस कणकवली पोलीस स्टेशन या ठिकाणी सूचना दिल्या.त्यानुसार स्वतः सौ माधवी दळवी आणि राजा साटम यांनी पदरची रक्कम खर्च करत या महिला कणकवली याठिकाणी पोलिसांच्या स्वाधीन केले
दरम्यान तोपर्यंत पत्रकार संजय सावंत यांनी कित्येक निराधार लोकांसाठी आधाराचे विश्वासू ठिकाण बनलेले सविताश्रम पणदूर याठिकाणी आश्रमाचे प्रमुख संदीप परब याना मोबाईल वरून संपर्क साधत या निराधार महिलेची वस्तुस्थिती समजावून सांगत या महिलेस आपल्या आश्रमात आधार देण्याची विनंती केल्यावर संदीप परब यांनीही तयारी दाखविली.दरम्यान त्या नुसार कोव्हिड च्या पार्श्वभूमीवर आज कणकवली पोलीस स्टेशन कडून या महिलेची कोव्हिड टेस्ट करून या  निराधार महिलेची रवानगी पणदूर येथील सविताश्रम याठिकाणी करणार आहेत.
फोंडाघाट  शिवसेना महिला कार्यकर्त्या सौ माधवी दळवी ,नैना साटम ,राजा  साटम यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळेच आज या निराधारपणे उन्हातान्हातून वनवन  फिरणाऱ्या या महिलेस आधार मिळाला याबाबत या सर्वांचे कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!