*कोकण Express*
*झरेबांबर येथील ज्येष्ठ नागरिकांना अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवण्याचा कट*
*झरेबांबर येथील ज्येष्ठ नागरिकांना अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवण्याचा कट*
दोडामार्ग:वैयक्तिक वादातून झरेबांबर येथील ज्येष्ठ नागरिक व मानकरी पांडुरंग गवस व काशिनाथ शेटकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैयक्तिक वादातूनच हा प्रकार असल्याचा दाट संशय असून या समाज बांधवांच्या पाठीशी आपण ठामपणे उभी राहणार असल्याचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी सांगितले.
झरेबांबर येथे काही दिवसांपूर्वी पांडुरंग गवस,काशिनाथ शेटकर आदींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झरेबांबर येथील सुरू असलेल्या वैयक्तिक वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा संशयही डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी व्यक्त केला आहे.
अॅट्रॉसिटीचा गैरवापर करून समाजातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे जर त्रास दिला गेला तर समाजात तेढ निर्माण होऊन गावातील सामाजिक वातावर बिघडण्याची शक्यता आहे.अशी घटना निकोप सामाजिक वातावरणासाठी घातक असल्याची भीतीही अनिशा दळवी यांनी व्यक्त केली.
झरेबांबर येथील या घटनेमुळे समाजातील ज्येष्ठ नागरिक अडचणीत सापडले असून त्यांना समाजातुन सर्व स्तरातून पाठींबा मिळावा आणि पुन्हा असले प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी केले आहे.