*कोकण Express*
*मालवणात निराधार योजनेच्या ६९ प्रकरणांना मंजुरी*
मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक तालुका अध्यक्ष मंदार केणी व तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत ६९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे दि ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संजय गांधी निराधार योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. उत्पनाचे दाखले तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक पूर्तता केली जाणार आहे. सेतू सुविधाही त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना सोईस्कर पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता एकाच ठिकाणी व्हावी, हा उद्देश आहे. लाभार्थ्यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदार केणी यांनी केले आहे.