*कोकण Express*
*माजी जिल्हा परिषद सदस्या प्रगती तावडे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम…*
*सावंतवाडीतील महिला अंकुर निवारा केंद्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी जिल्हा परिषद सदस्या प्रगती तावडे यांचा ६० वा वाढदिवस अनोखा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या पुढाकारातून येथील महिला अंकुर निवारा केंद्रातील महिलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. दरम्यान त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत केंद्रातील व्यवस्थापकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी प्रचेता तावडे, सरिता सावंत, श्रद्धा सावंत, सुमती देसाई, श्रद्धा देसाई आदींसह मोठ्या संख्येने तावडे यांच्या सहकारी महिला उपस्थित होत्या.