*कोकण Express*
*देशाचा माजी सैनिक हा आमचा अभिमान ; आमदार नितेश राणे*
*“द कश्मीर फाईल्स” चित्रपट माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांनी दाखविला मोफत…!*
*भारत -पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा आमदार राणे यांनी केला सत्कार…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात हे देशाच्या तिन्ही सैन्य दलातील सैनिकांकडून शिकावे.देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फरमोठे आहे.हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याच प्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत.देशाच्या या खऱ्या संपप्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर,मानसन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून “द कश्मीर फाईल्स” चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत दाखविण्यात आला.यावेळी १९६५ आणि १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा आमदार नितेश राणे बोलत होते.
यावेळी माजी सैनिक कणकवली संघटनेचे अध्यक्ष संतोष उर्फ नाना मुसळे,जिल्हा समन्वयक चंद्रशेखर जोशी,पतसंस्था महासंघाचे सचिव धनंजय राऊळ,उपाध्यक्ष धोंडीराम सावंत व निलेश परब, सचिव दत्तगुरू गावकर,मुख्य सल्लागार रविन्द्र पाताडे, दिनकर परब,ऑगस्टीन लोबो, महादेव तावडे,संतोष चव्हाण, मंगेश देसाई ,,सतिष भोसले, सदानंद सावंत,याच्या सह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर प्रहारचे संपादक संतोष वायगणकर, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री, चित्रपट मंदिर व्यवस्थापक राजू मल्हार,आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, द कश्मीर फाईल्स चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना दाखविणे या मागील उद्देश त्यावेळी वस्तुस्थिती काय होती आणि त्यावेळी आपल्या सैनिकांनी त्या काश्मीर मध्ये कसे काम केले होते.आज खूप परिस्थिती बदलली आहे.सरकार आणि प्रशासन भक्कम असल्याने आज दिसणारी स्थिती आणि पूर्वी ची परिस्थिती यातील फरक आपल्याला कळेल.आम्ही सोशल मीडियाच्या जमान्यात राहतो मात्र ज्या जमन्याय सैनिकांनी काम केले ,देशाचे काश्मीरच्या सीमेवर उभे राहून रक्षण केले तो काळ कसा होता आणि तेव्हा त्यांनी अशा बिकट परिस्थितीत काम केले होते म्हणून आम्ही सुरक्षित होतो. ही वस्तुस्थिती तुम्ही जाणून घ्या आणि माजी सैनिकांचा आदर करा.आजचा सत्कार हा या माजी सैनिकांच्या ऋणातून उतराई होणासाठी आहे.तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तत्पर आहे.देशाचे केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे साहेब आपल्या सोबत आहेत.सैनिकांचा प्रत्येक प्रश्न आपण मोदी सरकार च्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.दम्यान कार्यक्रमाचे प्रास्थाविक पत्रकार संतोष राऊळ यांनी केले.
माजी सैनिकांचा झाला शाल, श्रीफळ देऊन केला सत्कार
यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी ज्या माजी सैनिकांनी १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभाग घेतला होता त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.यात परमवीर चक्र प्राप्त सुभेदार अंकुश महादेव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.तो त्यांच्या पत्नीने स्वीकारला.तर लान्स नायक सदाशिव बाईत यांचा सत्कार झाला तो त्यांच्या सुनबाई रश्मी बाईत आणि कुटुंबीयांनी स्वीकारला. नायक शांताराम तांबे यांचा सत्कार पत्नी श्रीमती संगीता तांबे,मुलगा संतोष आणि मुलगी गीता तांबे यांनी स्वीकारला. १९७१ च्या युद्धातील पहिल्या फळीतील शिपाई कलमठ बाजारपेठ येथिल दिवाकर पांगम यांचा सत्कार शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.तर याच युद्धातील दुसरे शिपाई – नाईक, दिगंबर जाधव यांचाही यावेळी सत्कार झाला.तर माजी सैनिक जिल्हा समन्वयक चंद्रशेखर जोशी,तालुका अध्यक्ष संतोष उर्फ नाना मुसळे,महासंघाचे सचिव धनंजय राऊळ, यांचा सत्कार करण्यात आला.तर माजी सैनिक संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा व पत्रकार संतोष राऊळ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 370 कलम का हटवावे लागले हे “द कश्मीर फाईल पिक्चर” मधून समजेल – आमदार नितेश राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 370 कलम का हटवावे लागलं हे कश्मीर फाईल पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला समजेल असे आमदार नितेश राणे यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक यांना द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्या प्रसंगी सांगितले. कारण त्यावेळी कश्मीर मध्ये राहणाऱ्या लोकांवर जे अन्याय अत्याचार झाले ते आपल्या पुढील पिढीला माहिती असावेत तसेच आपला इतिहास भावी पिढीला समजावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना रविवारी मोफत द कश्मीर फाइल्स पिक्चर कणकवलीत दाखविला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपट सर्वांनी पहावा असे सांगितल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना चित्रपट निर्मिती दाखविला होता. आज माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना हा चित्रपट मोफत दाखविला.