*कोकण Express*
*भिरवंडे रामेश्वर मंदिर येथील पैठणीच्या पल्लवी वास्कर-सावंत ठरल्या मानकरी*
*रुचिरा अनिल सावंत उपविजेत्या तर रंजना जनार्दन सावंत यांना तिसरा क्रमांक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीच्या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील पल्लवी प्रकाश वास्कर- सावंत यांनी पटकावला आहे. उपविजेत्या रुचिरा अनिल सावंत तर रंजना जनार्दन सावंत यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना तीन पैठणी देऊन गौरविण्यात आले. पैठणी खेळाचे सूत्रसंचालन रमेश उर्फ बाळू वालावलकर यांनी केले. सहभागी स्पर्धाकांनाही भेटवस्तू आणि प्रेक्षकांना पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे गुढी पाडव्याचे औचित्य साधून खेळ पैठणीचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गावातीलच तब्बल ६३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. शेकडो ग्रामस्थ आणि महिला या स्पर्धेसाठी उपस्थित होत्या. रात्री 10 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. स्पर्धेच्या सहभागी महिलांना हमखास बक्षीस देण्यात आले. तसेच प्रेक्षकांमधील शाळकरी मुले आणि महिला तसेच उपस्थित ग्रामस्थांना ही विविध प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना ही पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यामध्ये लहान मुलांमध्ये श्रावणी अमोल सावंत, संजीवनी पुंडलिक सावंत, मुग्धा प्रदीप सावंत आणि कोमल मंगेश सावंत यांचा गौरव करण्यात आला.
तसेच प्रकाश अंकुश वास्कर, सुप्रिया सुनिल सावंत, अन्वी अमोल सावंत,आशिष प्रकाश सावंत आणि पंढरी गणपत सावंत यांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गुढीपाडव्याचे औचित्यसाधून आयोजित या स्पर्धेला डॅा. प्रथमेश मोहनराव सावंत यांनी पैठणी पुरस्कृत केल्या होत्या. श्रीदेव रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विविध प्रकारची प्रश्नमंजुषा, संगीतखुर्ची अशा विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिध्द सूत्रसंचालक बाळू वालावलकर यांनी मनोरंजनात्मक प्रश्न विचारून रसिकप्रेक्षकांची ही दाद मिळवली. यावेळी पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, गांधीनगर सरपंच राजेंद्र सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष जयंवत सावंत, खजिनदार सुर्यकांत सावंत, संचालक संजय सावंत, प्रकाश घाडीगांवकर, संदीप सावंत, सुरेश सावंत, मंगेश सावंत, संतोष सावंत, रमेश सावंत, राकेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण संचालक तथा पत्रकार अजित सावंत, तुषार सावंत यांनी केले.