*कोकण Express*
*मळेवाड-हेदुलवाडी गावचे सुपुत्र विजय भास्कर नाईक यांना मुंबई पोलिस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-हेदुलवाडी गावचे सुपुत्र विजय भास्कर नाईक यांना मुंबई पोलिस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
नुकतीच मुंबईच्या पोलीस विभागात अधिकाऱ्यांना पदोन्नती जाहिर करण्यात आली. या अधिकाऱ्यामध्ये सावंतवाडीत तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील व सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरीनिमित्त असणारे विजय भास्कर नाईक यांना मुंबई पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांच्या हस्ते नाही यांना पदोन्नती स्टार देऊन प्रदान करण्यात आली.नाईक यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या मळेवाड गावातून पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर विजय नाईक यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल मळेवाड-कोंडूरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे विषेश अभिनंदन केले आहे.विजय भास्कर नाईक यांनी अथक परिश्रम घेतल्या नंतर ते 15-05-1985 मध्ये राज्य राखीव पोलीस (SRP) दला मध्ये भरती झाले. राज्य राखीव पोलीस दला मध्ये असताना त्यांनी गडचिरोली, आसाम, दिल्ली व गुजरात या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य पार पाडले.त्या नंतर त्यांची 2005 रोजी बृहन मुंबई पोलीस दलात हवालदार या पदावर बदली झाली मुंबई पोलीस दलात हवालदार या पदावर काम करतांना त्यांनि मरोल L-A-4, कस्तुरबा पोलीस ठाणे व ओशिवरा पोलीस ठाणे मध्ये आपले एकनिष्ठ पणे कर्तव्य पार पाडले.गेल्या 36 वर्षाच्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवर त्यांनी चांगले काम केले आहे या कार्यकाळात त्यांना 47 वेळा बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.श्री मुसळेश्वर कला-क्रीडा मंडळ मळेवाड हेदुलवाडी, श्री मुसळेश्वर कला-क्रीडा मंडळ मुंबई व युवा मित्र मंडळ मळेवाड-कोंडूरे या मंडळातील सभासदांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.