राष्ट्रीय परिषदेचा फायदा विद्यार्थी-शिक्षक व राष्ट्राला होतो

राष्ट्रीय परिषदेचा फायदा विद्यार्थी-शिक्षक व राष्ट्राला होतो

*कोकण Express*

*राष्ट्रीय परिषदेचा फायदा विद्यार्थी-शिक्षक व राष्ट्राला होतो*

*दळवी महाविद्यालयाच्या विश्वनाथ समीट-२०२२ मध्ये डॉ.प्रमोद पाब्रेकर यांचे प्रतिपादन.*

*कासार्डे  ः संजय भोसले*

तळेरे येथील मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, के. व्ही पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली, यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांच्या मार्गदर्शना नुसार, ‘भारतीय सामाजिक वातावरणावर कोविड -१९ महामारीचे झालेले बहुआयामी परिणाम’ (multidimensional Implications of Covid – 19 in Indian Milieu) या विषयावर एक दिवसीय आभासी राष्ट्रीयचर्चा सत्राचे आयोजन एनसीसी, एनएसएस, डीएलएलई व रिसर्च सेल यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. या राष्ट्रीयचर्चा सत्राच्या प्रसंगी फादर किथ डिसोझा, अध्यक्ष, झेवियर्स कॉलेज मुंबई, डॉ. सॅमसन डेव्हिड, माजी सहसचिव, भारतीय विश्वविद्यालय संघ, श्री. विनायक दळवी, माजी मानद मार्गनिर्देशक दळवी महाविद्यालय आणि संस्थापक, सिंधु स्वाध्याय संस्था,डॉ. अनुराधा मजुमदार, अधिष्ठाता, विज्ञान विद्या शाखा मुंबई विद्यापीठ, डॉ. प्रमोद पाब्रेकर, वरिष्ठ सल्‍लागार, रूसा महाराष्ट्र राज्य, डॉ. राजेंद्र शिंदे, प्राचार्य,सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, डॉ.सुर्यकांत लसुणे प्राचार्य,के.व्ही पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली, डॉ. अमरदीप अंबोरे, सहा.प्राध्यापक मानसशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, मा.श्रीपाद वेलिंग, प्र. संचालक, सिंधुदुर्ग उपपरिसर, मुंबई विद्यापीठ व समन्वयक, दळवी महाविद्यालय. हे उपस्थित होते.

दळवी महाविद्यालयात 2020 साली भारतातील पहिली आभासी राज्यस्तरीय परिषद कोरोनाच्या महामारीत, महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन शिक्षकांनी यशस्वी करून दाखवली. या वेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा.उदय सामंत उपस्थित होते.

राष्ट्रीयचर्चा सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. महाविद्यालय यशोगाथे सोबत महाविद्यालय गीत सादर करण्यात आले. सहा.प्रा.हेमंत महाडीक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

श्रीपाद वेलिंग यांनी महावियालयाचे प्रास्ताविक सादर करतांना म्हणाले कि, ‘दळवी महाविद्यालयात दोन राज्यस्तरीय परिषदा झाल्या ,यंदा राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ या जागतिक महामारीचे भारतीय वातावरणावर झालेल्या बहुआयामी परिणामांची कारण मिमांसा व उपाय शोधण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाईल’.

डॉ. सॅमसन डेव्हिड, या वेळी बोलतांना म्हणाले कि, ‘ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे आहेत, चिकित्सा व कलात्मकता वाढवण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी करावे, नवीन शैक्षणिक धोरणाने हे साध्य होवू शकेल’.

डॉ. अनुराधा मजुमदार या वेळी बोलतांना म्हणाल्या कि, कोव्हिड-१९ महामारीचा परिणाम मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रावर झाला, आपल्याला असे वाटत होते कि, आपले पूर्ण नियंत्रण निसर्गावर आहे, निसर्गाने दाखवून दिले कि, निसर्गाला नियंत्रित करता येत नाही, निसर्गाचा आदर करत निसर्ग नियमांचे पालन करून आपण जगायला शिकले पाहिजे.

डॉ.प्रमोद पाब्रेकर समारोपीय भाषणात म्हणाले कि, दरवर्षी 29 मार्च रोजी दळवी महाविद्यालय परिषदेचे आयोजन करते, हि एक चांगली बाब असून याचा फायदा विद्यार्थी-शिक्षक व राष्ट्राला होतो, या आयोजना मागील श्री.विनायक दळवी व महाविद्यालयाच्या कार्याची मी प्रशंसा करतो असे म्हणाले’.

उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ.दिलीप भारमल, प्राचार्य, एस.पी.के महाविद्यालय सावंतवाडी यांनी केले.या नंतरच्या सत्रात संशोधकांनी शोधपत्रांचे वाचन केले.
या वेळी पर्यवेक्षक म्हणून मा. साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर व डॉ. सिद्धेश्वर दिसले प्राचार्य, एसआरएम महाविद्यालय, कुडाळ यांनी आपले मत व्यक्त केले.

डॉ. राजेंद्र शिंदे, प्राचार्य,सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, यांनी समारोप समारंभाच्या मान्यवरांचे स्वागत केले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे सहा.प्रा. प्रदीप साळवे यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. नाविन्यपूर्ण माहिती, संशोधनाने भरलेल्या या विश्वनाथ समिटचा समारोप वंदेमातरम या गीताने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!