नवीन कुर्ली येथे हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित भव्यदिव्य शोभायात्रा

नवीन कुर्ली येथे हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित भव्यदिव्य शोभायात्रा

*कोकण Express*

 *नवीन कुर्ली येथे हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित भव्यदिव्य शोभायात्रा*

 *नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन*

हिंदु नववर्षे, गुढीपाडव्याचे जल्लोषी स्वागत आज नवीन कुर्ली येथे नवदुर्गा युवा मंडळ आयोजित पहिल्यांदाच शोभा यात्रा काढुन करण्यात आले. हिंदु नववर्ष, गुढीपाडवा निम्मित नववर्षाचे स्वागत यात्रेमध्ये गावातील ग्रामस्थ,महिला वर्ग, लहान मुले पारंपरिक वेशभूषेमध्ये जल्लोषात सहभागी होवुन नववर्षाचे स्वागत केले. नवदुर्गा युवा मंडऴ गेली २० वर्षे गावामध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते आज मंडळाकडुन हिंदु धर्माच्या सणांचे महत्व तसेच संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.
नववर्ष स्वागत शोभा यात्रेत नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते सचिव धिरज हुंबे,सुरज तावडे,कृष्णा परब,प्रकाश दळवी,अंकुश पिळणकर,शरद पवार,योगिता मडवी,प्रिया दळवी तसेच नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी,सचिव अविनाश चव्हाण,अरुण पिळणकर,मंगेश मडवी,अमित दळवी,प्रदिप आग्रे,विजय आग्रे,अनिल दळवी आदी परिसरातील नागरिक तसेच तरुण, अबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला उपस्थिती होत्या तसेच या शोभा यात्रा नंतर महिला व मुलांकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते.
गुढीपाडव्याच्या या शुभदिनी रात्रौ ठिक ०९:०० वा. भवदिव्य ओपन थिएटर LED Screen वर ऐतिहासिक मराठी चित्रपट पावनखिंड सर्वासाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा अस् नवदुर्गा युवा मंडळाकडुन आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!