*कोकण Express*
*समाजसेवक सुनिल नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भुईबावडा येथे भव्य क्रिकेट स्पर्धा*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
भुईबावडा गावचे सुपुत्र समाजसेवक, मुंबई येथील प्रसिध्द स्पर्शिका बिल्डर व उद्योजक सुनिल नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ ते ११ एप्रिल या कालावधीत भुईबावडा येथे भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३० हजार, व्दितीय २० हजार व तृतीय १० हजार रुपये इतके आहे. प्रथम तीन संघाना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच मालिकावीर ३ हजार ३३३, उत्कृष्ट फलंदाज ५ हजार ५५, उत्कृष्ट गोलंदाज ३ हजार ३३३ व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ३ हजार ३३३ रुपये व चषक दिले जाणार आहे.
सहभागी संघातील खेळाडूंना मोफत टी शर्ट दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेची प्रवेश फी ५०० रुपये इतकी असणार आहे. तरी इच्छूक संघानी आपली नाव नोंदणी २ एप्रिल पर्यंत करायची आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दिनेश मोरे ८०८०६९४२४३, जितू तळेकर ८८०५३१२१०९, इंद्रजीत समई ९३७३७८९७७०, सोमेश्वर बिले ८२६२९१८२५३, अमोल प्रभू ७९७२८४१९४०, दिपक मोरे ८६९१८३७१५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे…