*कोकण Express*
*तळेरे येथे शनिवारी स्वरपाडवा कार्यक्रम*
*कासार्डे : संजय भोसले*
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त तळेरे येथील श्री. गांगेश्वर मंदीरात स्वरपाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे.
मराठी नववर्षानिमीत्त प्रसाद शेवडे आणि सावनी शेवडे यांच्या अभंग व नाट्य गीतांचा सुमधूर नजराणा असलेला स्वरपाडवा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. गांगेश्वर नाट्य मन्डळ व श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
यासाठी ऑर्गन सुधान्शू सोमण, तबला दर्शन घाडीगावकर, पखवाज विकास नर, टाळ अंकित घाडिगावकर यांची साथ लाभनार असुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावंत करणार आहेत. या कार्यक्रमाला दशक्रोशीतील संगीतप्रेमीनी उपस्थीत राहण्याचे आवाहन मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.