*कोकण Express*
*ढोलताशा पथक तसेच लेझीम व ध्वज पथक, वारकरी दिंडी यांच्या उपस्थितीत कणकवलीमध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत गुढीपाडवा जल्लोषात होणार*
कणकवली हिंदू नववर्ष स्वागत समिती आयोजित कणकवली शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या स्वागत यात्रेमध्ये सिंधुगर्जना ढोलताशा पथक १०० कलाकारांच्या संचात पारंपरिक वेशभूषेमध्ये जल्लोषात सहभागी होत आहे व खास हिंदू सण व प्रबोधनपर संदेश तसेच चित्रे ढोलांवर रंगविण्यात आली आहेत व सजावट केली आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या सणांचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न व संस्कृती संवर्धनाचा प्रयत्न केला आहे. नववर्ष स्वागत समिती कणकवली या स्वागतयात्रेत कणकवली शहर व परिसरातील हजारो नागरिक तसेच तरुण,अबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि वारकरी व कलाकारांच्या उपस्थितीत नेत्रदीपक होणार आहे.ही शोभायात्रा ठीक ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होईल व समारोप श्री देव शिवारा मंदिर कणकवली येथे होईल सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन नववर्ष स्वागत समिती कणकवली तर्फे करण्यात आले आहे