*कोकण Express*
*माननीय जिल्हाधिकारी तथा प्राणीक्लेश निवारण समिती अध्यक्षा, सिंधुदुर्ग–पत्र*
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मुक्या प्राण्यांच्या झुंजींना पायबंद घालणेबाबत
*सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी: -*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्या प्राण्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बैलांच्या एका जीवघेण्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या झुंजीत एका बैलाला अप जीव गमवावा लागला. त्या बैलाने आपला जीव गमवावा लागल्यानंतरही काही विकृत लोक आपल्या तितक्याच विकृत आनंदासाठी त्या बैलाला त्रास देत असल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून झुंजींच्या या प्रकारावर चोहीबाजुंनी टीका होत आहे. या प्रकारामुळे आपल्या शांतीप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लौकिकाला अक्षरशः काळिमा फासला गेला आहे. आपल्या जिल्ह्यात इतकी हिंस्त्र आणि क्रूर घटना आजपर्यंत कधीही घडलेली नाही. मात्र या घटनेने सर्वांचीच मान शरमेने खाली गेली आहे.
तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेले हे जीवघेणे प्रकार त्वरित थांबवून असा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आम्ही याद्वारे करीत आहोत.
आपले नम्र
प्रत माहितीसाठी
मा.पोलीस निरीक्षक, कुडाळ
मा.पोलीस निरीक्षक, मालवण
मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग
मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
आपला विश्वासू
अविनाश पराडकर
गोवंश रक्षण समिती सदस्य तथा महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष