*कोकण Express*
*ताबा सुटल्याने कार कोसळली कालव्यात!*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
सुदैव म्हणजे काय याचा प्रत्यय आज साटेली भेडशी भोमवाडी येथील तिराळी धरणाच्या कालव्यावर आला. तिलारी धरण कालव्याच्या अरुंद रस्त्यावरून एक कार चालक आपली कार घेऊन जात असताना अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून सदर कार सरळ कालव्यात कोसळली. मात्र कार चालत केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची माहिती घटनास्थळावरून मिळते आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, हा चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊन या कालव्यावरून जात असताना कारवरील ताबा सुटल्याने कार कालव्यात कोसळली व पलटी झाली यावेळी प्रसंगावधान राखून गाडीच्या काचा फोडून चालक बाहेर आल्याने वाचला.
उशिरा पोलिसांकडून मिळालेलया माहितीनुसार हि कार कालव्या बाहेर काढण्यात आल्याचे व हि कर जैन नामक उद्योजकाची असल्याचे समजते.