*कोकण Express*
*सिंधुदुर्गात राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप…!*
*कणकवलीत केली निदर्शने…!*
*संपाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कामगार कायद्यातील बदल तातडीने रद्द करा, सरकारी बँकांचे खाजगीकरण थांबवा, धनदांडग्यांची थकीत-बुडीत कर्जे वसूल करावीत, शिपाई भरती लिपिक भरती, आर्म गार्ड भरती अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला सिंधुदुर्गात आज दुसऱ्या दिवशी ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वानी हातात झेंडे,फलक घेऊन निदर्शने कणकवलीत जोरदार केली.
बँक कर्मचाऱ्यांनी कणकवली बाजारपेठ मध्ये पत्रक वाटून व हातात फलक घेऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलन निदर्शने केली.यावेळी बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, कॉ. विजय महाडिक, कविता भगत, निखिल साटम, संध्या मालवणकर, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाॅईज युनियन कोल्हापूर काॅ. संतोष रानडे, काॅ. रोहन परब, उज्वला धांजी आदींसह बँक कर्मचारी सहभागी झाले होते.