*कोकण Express*
*पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात*
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सिक्युरिटी मधील तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे.
मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे ज्या गाड्या असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आपटून हा अपघात झाला. या अपघातात हॉटेल मधुबन नजीक झाला. यात कोणी जखमी झाले नसले तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.